Posts

आपण लाईट बंद करूयात का?

आपण लाईट बंद करूयात का? मी विचारले....आणि निसंकोचपणे ती ‘हो’ म्हणाली... असा प्रसंग माझ्या आयुष्यात प्रथमच घडत होता.रात्रीचे बारा वाजुन गेले होते.आम्ही एकाच रूम मध्ये होतो.दवाखान्याची ती रूम होती.पेशंट च्या नातेवाईकांला झोपण्यासाठी ती रूम होती.एकावरती एक तीन जण झोपतील अशा पद्धतीने ते बेड बनवलेले होते.असे दोन बेड म्हणजे एकूण सहा जण झोपु शकतील अशी सुविधा तेथे होती. बल्बच्या प्रकाशात ती रूम उजाळून निघाली होती आणि माझी झोपण्याची व्यवस्था त्याच रूम मध्ये होती.मी रूम मध्ये गेलो तर माझ्या अगोदर तिथे एक सुंदर,देखणी मुलगी एकटीच बसलेली होती म्हणुन मी जसा आत गेलो तसा बाहेर आलो.मला वाटल हिच्या घरचे कुणी येथे आल्यावर ती निघुन जाईन आणि तिचा घरचा कुणी पुरुष तेथे त्यांच्या पेशंट साठी थांबेल.मग आपण आत झोपायला जाऊ.पण दवाखाण्यातील सुरक्षा कर्मचा-याने सांगितले की ती मुलगी येथेच झोपणार आहे.असे ऎकल्यावर मी स्तब्ध झालो,कारण एका मुली सोबत मला एकाच रूम मध्ये झोपावे लागणार होते.मी काही वेळ रुमच्या बाहेरच सुरक्षा कर्मचा-याजवळ बसून राहिलो.परंतु दिवसभर पेशंट सोबत असल्याने आणि पेशंट चौथ्या मजल्यावर असल्यान स...